Sunday, 24 September 2017

छञपती शिवाजीमहाराज

छञपती शिवरायांचे लोककल्याणकारी कार्य साडेतीनशे वर्षांनंतर ही कोट्यावधी भारतीयांना स्वाभिमान व स्वातंत्र्याची स्फूर्ति देत आहे. सार्‍या जगाला आकर्षित करीत आहेत. शिवरायांचे कल्याणकारी कार्य अद्यापही ताजे टवटवीत आहे. सर्वगुणसंपन्न लोकहितकारी शिवरायांनी कष्टकरी, शूर मावळ्यांच्या, प्रजेच्या कल्याणासाठी दुरदृष्टिकोन ठेवून राज्य कारभार केला. असा शककर्ता शेकडो वर्षांनीच होत असतो. राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी 'क्षञियकुलावतंस' हा किताब धारण केला. कष्टकरी प्रजेला समानतेची वागणूक देणाऱ्या शिवरायांनी आपला 'राज्याभिषेक शक' ही नवीन कालगणना म्हणून वर्षारंभ (पाडवा) सुरू केला . राजपुत्र नसताना शिवरायांनी, स्वतःच्या असामान्य कर्तृत्वावर रयतेचे स्वतंत्र राज्य निर्माण केले. संपूर्ण जगात असा राजा या पूर्वी झाला नाही व या पुढे ही होणार नाही.

No comments:

Post a Comment