Shri.Dattaji Laxman Nalawade
Off Add : Chatrapati Shivaji Maharaj Smarak, Shiv-Shambhu Shilpa Shrushti At Post.Nigade Mose, Osade B/o Panshet Road, Pune, MH Cont:9420176492,9552014925,9420873680
Sunday, 24 September 2017
छञपती शिवाजीमहाराज
छञपती शिवरायांचे लोककल्याणकारी कार्य साडेतीनशे वर्षांनंतर ही कोट्यावधी भारतीयांना स्वाभिमान व स्वातंत्र्याची स्फूर्ति देत आहे. सार्या जगाला आकर्षित करीत आहेत. शिवरायांचे कल्याणकारी कार्य अद्यापही ताजे टवटवीत आहे. सर्वगुणसंपन्न लोकहितकारी शिवरायांनी कष्टकरी, शूर मावळ्यांच्या, प्रजेच्या कल्याणासाठी दुरदृष्टिकोन ठेवून राज्य कारभार केला. असा शककर्ता शेकडो वर्षांनीच होत असतो.
राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी 'क्षञियकुलावतंस' हा किताब धारण केला. कष्टकरी प्रजेला समानतेची वागणूक देणाऱ्या शिवरायांनी आपला 'राज्याभिषेक शक' ही नवीन कालगणना म्हणून वर्षारंभ (पाडवा) सुरू केला . राजपुत्र नसताना शिवरायांनी, स्वतःच्या असामान्य कर्तृत्वावर रयतेचे स्वतंत्र राज्य निर्माण केले. संपूर्ण जगात असा राजा या पूर्वी झाला नाही व या पुढे ही होणार नाही.
Thursday, 21 September 2017
छत्रपती शिवरायांचे अस्सल दुर्मिळ जलचित्र . इतिहास संशोधक दत्ताजी नलावडे यांच्या संग्रहात आहे. सिंहगडाच्या पश्चिमेला पुणे पानशेत रस्त्यावरील ऐतिहासिक निगडे मोसे येथील छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज शिल्प सृष्टी मध्ये हे दुर्मिळ जल चित्र आहे. राज्य तसेच देशभरातील शिवभक्त ,तरूण येथे येऊन शिवरायांना मानवंदना देत आहेत
Subscribe to:
Posts (Atom)